कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांचा जीवनपरिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 13:29 IST2017-10-15T13:29:24+5:302017-10-15T13:29:29+5:30
श्रीगोंदा येथील कुकडी कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप उर्फ तात्या (वय ७०) यांचे रविवारी सकाळी १०.३० वाजता कोईमतूर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांचा जीवनपरिचय
अहमदनगर : श्रीगोंदा येथील कुकडी कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप उर्फ तात्या (वय ७०) यांचे रविवारी सकाळी १०.३० वाजता कोईमतूर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. श्रीगोंदा येथील कुकडी कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप उर्फ तात्या (वय ७०) यांचे रविवारी सकाळी १०.३० वाजता कोईमतूर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.१६) सकाळी नऊ वाजता कुकडी कारखाना स्थळावर अंत्यसंस्कार होणार आहेत. श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचे ते वडील होते.
विसापूर ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर
सदस्य, जिल्हा परीषद अहमदनगर -१९७३ ते २००२
सभापती, पंचायत समिती श्रीगोंदा - १९८३ ते १९९०
संचालक, जिल्हा सहकारी बँक - २००२ ते २०१५
संस्थापक व सचिव, कुकडी शिक्षण संस्था,पिंपळगाव पिसा - १९८२ पासून आजतगायत
मुख्यप्रवर्तक, कुकडी साखर कारखाना,पिंपळगाव पिसा -१९८९ ते१९९७
चेअरमन कुकडी साखर कारखाना.विद्यमान संचालक कुकडी साखर कारखाना - १९९७ ते २००९