महिलेच्या खूनप्रकरणी जन्मठेप

By Admin | Updated: April 6, 2016 00:16 IST2016-04-06T00:11:10+5:302016-04-06T00:16:48+5:30

अहमदनगर : ममताबाई कचरू उबाळे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी अशोक रेवजी जाधव (वय २६) यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश पी़ डी़ दिग्रसकर यांनी मंगळवारी सुनावली़

Life imprisonment for murder of woman | महिलेच्या खूनप्रकरणी जन्मठेप

महिलेच्या खूनप्रकरणी जन्मठेप

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगावातील ममताबाई कचरू उबाळे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी अशोक रेवजी जाधव (वय २६) यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश पी़ डी़ दिग्रसकर यांनी मंगळवारी सुनावली़
येथील जिल्हा न्यायाधीश दिग्रसकर यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणी सुनावणी झाली़ सरकारच्या वतीने अ‍ॅड़ सुरेश लगड, अनिल डी़ सरोदे यांनी बाजू मांडली़ फिर्यादी कचरू विष्णु उबाळे (रा़ पाडळी रांजणगाव, ता़ पारनेर) हे पाटबंधारे विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकपदी निवड झाली होती़ राजकारणात भाग घेतो काय, तुला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी आरोपी जाधव याने दिली होती. चौकीदार उबाळे ७ जुलै रोजी सायंकाळी ते घरी आले़ रात्री नऊच्या सुमारास ते झोपण्यासाठी निघून गेले़ पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांना आईचा ओरडण्याचा आवाज आला़ तेव्हा त्यांनी दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला़ पण, आरोपीने बाहेरून कडी लावली होती़ कचरू उबाळे यांनी मुलगा राजेश यास कडी उघडण्यास सांगितले़ मात्र, राजेशच्या खोलीचाही दरवाजा आरोपीने बाहेरून लावला होता़ राजेश याने शेजाऱ्यास माहिती देऊन दरवाजा उघडण्यास सांगितले, त्यामुळे आरोपी पळाला़ जाताना त्याने कचरू उबाळे झोपलेले असल्याचे समजून आई ममताबाई यांच्या डोक्यावर लोखंडी पाईप मारून गंभीर जखमी केले़ त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

Web Title: Life imprisonment for murder of woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.