छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:39 IST2021-02-21T04:39:30+5:302021-02-21T04:39:30+5:30
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे ग्रामस्थांतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यात ते बोलत होते. ढोल-ताशांचा गजरात अन् फटाक्यांच्या ...

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन प्रेरणादायी
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे ग्रामस्थांतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यात ते बोलत होते. ढोल-ताशांचा गजरात अन् फटाक्यांच्या आतशबाजीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा उत्साहात पार पडला. यानिमिताने जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व शिवआरती करण्यात आली. प्रसंगी सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, गणेश दिघे, दिलीप सोनवणे, अशोक जगताप, रावसाहेब जगताप, अमोल दिघे, मच्छिंद्र दिघे सहित पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.
तळेगाव दिघे येथे शिवजयंती निमित्ताने चौफुली परिसर भगवेमय बनला होता. शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार व जयघोषाने चौफुली परिसर दणाणून गेला होता.
यानिमित्ताने शिववंदन, शिवस्तवन कार्यक्रम पार पडले. राजू गुंजाळ, राजू दिघे, सोमनाथ दिघे यांनी वृक्षारोपण केले. प्रसंगी बाल शिवाजी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सरपंच बाबासाहेब कांदळकर, दिलीप सोनवणे, अशोक जगताप यांची भाषणे झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश दिघे यांनी केले.
फोटो : २०Talegaon Shiv Jayati Pujan
तळेगाव दिघे : येथे जयंती सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील, समवेत सरपंच बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे दिसत आहेत.