कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
By Admin | Updated: August 3, 2014 01:10 IST2014-08-02T23:57:49+5:302014-08-03T01:10:04+5:30
कोपरगाव : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार सुरत येथे गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे

कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
कोपरगाव : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार सुरत येथे गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे व कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक जयंत भिडे यांना प्रदान करण्यात आला.
सुरत येथे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनची वार्षिक सभा शनिवारी पार पडली़ यावेळी जीवन गौरव पुरस्कार माजी मंत्री कोल्हे व साखर उद्योगातील उपपदार्थाच्या आसवनी व्यवस्थापनासाठी दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जयंत भिडे यांना प्रदान करण्यात आला़ यावेळी गुजरातचे अर्थमंत्री सौरभ पटेल, वन मंत्री गणपतभाई वसावा, गुजरात फेडरेशनचे अध्यक्ष मानसीभाई पटेल, नवसारी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू ए़आऱ पाठक, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, उपाध्यक्ष साईनाथ रोहमारे आदी उपस्थित होते़
सत्कारास उत्तर देताना माजी मंत्री शंकरराव कोल्हे म्हणाले की, कष्टकरी शेतकरी स्वत:बरोबर समाजासाठी राबतो आणि त्यातून पोट भरतो़ त्यांना हा पुरस्कार मी समर्पीत करीत आहे़ त्यांच्यामुळेच माझा सन्मान आहे़ शेतकऱ्यांचे जीवन सुखी व्हावे, यासाठीच आजवरचा संघर्ष सुरू आहे़