क्रीडाशिक्षकांच्या समस्या शासन दरबारी मांडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:20+5:302021-04-16T04:20:20+5:30
महाराष्ट्रातील नावीन्याच्या ध्यास घेतलेल्या क्रीडा क्षेत्रातील क्रीडाशिक्षकांच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ''वाटचाल-आधूनिक शारीरिक शिक्षणाची'' या डिजिटल नियतकालीचा प्रकाशन सोहळा ...

क्रीडाशिक्षकांच्या समस्या शासन दरबारी मांडू
महाराष्ट्रातील नावीन्याच्या ध्यास घेतलेल्या क्रीडा क्षेत्रातील क्रीडाशिक्षकांच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ''वाटचाल-आधूनिक शारीरिक शिक्षणाची'' या डिजिटल नियतकालीचा प्रकाशन सोहळा ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला.
या प्रकाशन सोहळ्यासाठी अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक, नाशिक विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, मुंबई विभागाचे आमदार कपिल पाटील, पुणे विभागाचे आमदार जयंत आसगावकर, शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, वाटचालचे संपादक राजेश जाधव, उपसंपादक सुवर्णा देवळाणकर, घनश्याम सानप सर्व पदाधिकारी व क्रीडाशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, शासनाने गायरान जमिनी विद्यार्थ्यांमधील उपजत गुणांना न्याय देण्यासाठी, शाळेच्या क्रीडांगणासाठी द्याव्यात. क्रीडा गुण व संचमान्यता संदर्भात शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे.लवकरच निर्णय होईल. आमदार कपिल पाटील म्हणाले की, सहभागाची अट रद्द करून ग्रेसगुण मिळावे, कला-क्रीडा शिक्षक संचमान्यतेत यावा म्हणून सभागृहात व मंत्री महोदयांकडे सातत्याने पाठपुरावा असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल.
अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी नोकरी भरती, ग्रेसगुण, संचमान्यता, वरिष्ठ व निवडश्रेणी प्रश्नांबाबत लक्ष घालण्याचे आवाहन केले. राजेश जाधव शिवदत्त ढवळे, डॉ. मयूर ठाकरे, डॉ. जितेंद्र लिंबकर, राजेंद्र पवार, दिनेश म्हाडगूत, घनश्याम सानप, महेंद्र हिंगे, सुवर्णा देवळाणकर, तायप्पा शेंडगे, शेखर शहा, दत्तात्रय हेगडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशांत खिलारी यांनी तांत्रिक सहकार्य पुरविले.
महासंघाचे उपाध्यक्ष आनंद पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रितम टेकाडे यांनी मानले. तंत्रस्नेही म्हणून गणेश म्हस्के, राहुल काळे यांनी काम केले .
या प्रकाशन सोहळ्यासाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुल कोकमठाण यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.
---------
शारीरिक शिक्षण विषयातील ज्ञानाचा उपयोग समाजाला व्हावा, विषयासंबंधी संशोधन व्हावे व त्याचा प्रचार, प्रसार व्हावा, क्रीडाशिक्षकांचे कार्य महाराष्ट्रभर पोहोचावे, उपक्रमांच्या देवाण-घेवाणीतून विषयाचे महत्त्व अधोरेखित व्हावे म्हणून ‘वाटचाल’ नियतकालिकाची सुरुवात केली.
- राजेंद्र कोतकर, अध्यक्ष, शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ