तिसगाव : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच भूमिका घेतली आहे. कोरोनाच्या संकटात संघाने केलेले काम उल्लेखनीय असून, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेऊन प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिष्टमंडळास दिली. राज्याध्यक्ष देवीदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, संयुक्त सचिव दीपक भुजबळ, सातारा जिल्हाध्यक्ष संजीवन जगदाळे, विजय पल्लेवाड यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे दोन्ही मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षकांना रजा रोखीकरणाचा लाभ देणार तसेच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात संघटनेची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिले.
शिक्षक संघाचे प्रश्न मार्गी लावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST