कामरगावच्या शाहरब बाबा दर्गा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:42+5:302021-07-12T04:14:42+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील कामरगाव येथे बारफशहा डोंगरावर शाहरब बाबांचा दर्गा आहे. तेथे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. ...

कामरगावच्या शाहरब बाबा दर्गा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू
केडगाव : नगर तालुक्यातील कामरगाव येथे बारफशहा डोंगरावर शाहरब बाबांचा दर्गा आहे. तेथे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. त्याचे कॉंक्रिटीकरण करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले.
शाहरब बाबा हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. वर्षभरात तेथे संदल, उरूससह अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. तेथे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी कच्च्या रस्त्याच्या मजबुतीकरणासह काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे, भोयरे पठारचे सरपंच बाबा टकले, पिंपळगाव कौडाचे सरपंच सतीश ढवळे, युवा नेते अंकुश ठोकळ, नीलेश लंके प्रतिष्ठानचे चास गणप्रमुख सिद्धांत आंधळे, बापू शेख, सलिम शेख, सिकंदर शेख, शफिख शेख, रशीद शेख यांनी आमदार नीलेश लंके यांना निवेदन दिले. शाहरब बाबा हे माझेसुद्धा श्रद्धास्थान असून २ कि.मी. अंतराच्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.