सर्वांच्या सहकार्याने पाणंद, शिव रस्ते मार्गी लावू
By | Updated: December 5, 2020 04:34 IST2020-12-05T04:34:57+5:302020-12-05T04:34:57+5:30
कर्जत : सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानत सर्वांगीण विकास साधायचा आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेत परस्पर समन्वय साधत पाणंद ...

सर्वांच्या सहकार्याने पाणंद, शिव रस्ते मार्गी लावू
कर्जत : सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानत सर्वांगीण विकास साधायचा आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेत परस्पर समन्वय साधत पाणंद रस्ते व शिव रस्त्यांचा विकास करायचा आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.
कर्जत येथे जिल्हा प्रशासन, भारतीय जैन संघटना, नाम फाऊंडेशन व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थाप्रणीत परिवर्तन पर्व एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, नगरसेवक बापूसाहेब नेटके, रघुनाथ काळदाते, सुनील शेलार, नानासाहेब निकत, ऋषिकेश धांडे, तहसीलदार नानासाहेब आगळे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, गटविकास अधिकारी अमोल जाधव, विस्तार अधिकारी रूपचंद जगताप, अशोक जायभाय, झारेकरी, तात्यासाहेब ढेरे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, पाणंद, शिव रस्त्यांचा सर्वांना उपयोग होतो. त्यामुळे त्यावरून जिरवाजिरवीचे राजकारण नको. सर्वांना विश्वासात घेऊन हे काम करायचे असून, यासाठी श्रेयवाद अथवा राजकारण खपवून घेतले जाणार नाही.