कोरठणच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:19 IST2021-03-19T04:19:42+5:302021-03-19T04:19:42+5:30

अळकुटी : कोरठण खंडोबा गडाच्या विकासासाठी प्रयत्न राहू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. पारनेर तालुक्यातील पिंपळगाव ...

Let's keep striving for the development of Korthan | कोरठणच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू

कोरठणच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू

अळकुटी : कोरठण खंडोबा गडाच्या विकासासाठी प्रयत्न राहू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे त्यांनी नुकतीच भेट दिली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले उपस्थित होते.

भोसळे यांनी देवस्थान परिसराची पाहणी केली. देवस्थानचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग गायकवाड यांनी देवस्थानच्या विकास कामांची, पौराणिक महत्त्व, प. पु. गगनगिरी महाराज यांच्या हस्ते देवस्थानचा झालेला जीर्णोद्धार याविषयी माहिती दिली. मंडळ अधिकारी सचिन पोटे, दीपक कदम, गोपी घुले, गारगुंडी उपसरपंच प्रशांत झावरे, पुजारी विकास, दत्तात्रय क्षीरसागर, व्यवस्थापक भाऊसाहेब पुंडे, विक्रम ठोमे, समाधान पुंडे, अमोल ठोमे, सुखदेव गायकवाड आदी उपस्थित होते.

---

१८ कोरठण

पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबाचे दर्शन घेताना जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले, देवस्थानचे अध्यक्ष ॲड. पाडुरंग गायकवाड व इतर.

Web Title: Let's keep striving for the development of Korthan