धनगर समाजला मुख्य प्रवाहात आणू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST2021-08-21T04:24:49+5:302021-08-21T04:24:49+5:30
मांडवगण : धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणून आत्मसन्मान मिळवून देणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी ...

धनगर समाजला मुख्य प्रवाहात आणू
मांडवगण : धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणून आत्मसन्मान मिळवून देणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी केले.
खांडगाव (ता. श्रीगोंदा) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन सभा व धनगर समाज मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
शेलार म्हणाले, अहिल्यादेवी या उत्तम व आदर्श प्रशासक होत्या. त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम केले आहे. धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे.
यावेळी बाळासाहेब महाडिक, संजय आनंदकर, राजू महानोर, आदेश शेंडगे, सरपंच काकासाहेब ढवळे, दत्ता घाडगे, विठ्ठल ढवळे, आनंदा भगत, दादाराम टकले, राम घोडके, रमेश शिंदे, आनंद शिंदे, बबन श्रीराम, शिंदे मेजर, विलास ढवळे, नंदू शिंदे, सचिन पुजारी यांच्यासह विविध गावातील समाज बांधव उपस्थित होते.
प्रास्ताविक अध्यक्ष अमोल टकले यांनी केले. प्रा. अशोक टकले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सूर्यभान टकले यांनी आभार मानले.
----
२० खांडगाव शेलार
खांडगाव येथील धनगर समाज मेळाव्यात बोलताना घनश्याम शेलार.