महिलांना कर्तृत्व सिद्ध करू द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST2021-03-09T04:23:53+5:302021-03-09T04:23:53+5:30

जिल्हा कौटुंबिक न्यायालय, शहर बार असोसिएशन व महिला वकीलद्वारा संचालित न्यायाधार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांच्या ...

Let women prove their mettle | महिलांना कर्तृत्व सिद्ध करू द्यावे

महिलांना कर्तृत्व सिद्ध करू द्यावे

जिल्हा कौटुंबिक न्यायालय, शहर बार असोसिएशन व महिला वकीलद्वारा संचालित न्यायाधार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांच्या न्याय हक्काविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंक बोलत होत्या. कौटुंबिक न्यायालयात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश एन. एस. आणेकर, अहमदनगर शहर बार असोसिएशनच्या सचिव अ‍ॅड. मीनाक्षी कराळे, न्यायाधार संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड. निर्मला चौधरी आदींसह महिला वकील उपस्थित होत्या.

कंक म्हणाल्या महिलांप्रती समाजाची असलेली चुकीची विचारसरणी बदलण्याची गरज आहे. पुरान काळात महिलेला आद्यस्थान दिले होते. महिलांना नात्यामध्ये अडकवून न ठेवता महिलांनी महिलांचे दु:ख समजून घेतले पाहिजे. सासू आणि सुनेचे नाते सुधारले त्यांनी एकमेकीला आई आणि लेक म्हणून स्वीकारल्यास मोठा बदल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात अ‍ॅड. मनीषा केळगंद्रे यांनी केले.

न्यायाधीश आणेकर म्हणाल्या वृद्धांना दया, सहानुभूती देण्यापेक्षा त्यांना कामाच्या अनुभवावरून काम दिल्यास रोजगार उपलब्ध होऊन त्यांना सन्मानाने जगता येणार आहे. पीडितेला मनोधैर्य योजनेतून काही प्रमाणात मदत मिळते. मात्र मूल सांभाळ न करणार्‍या वृध्दांचे हाल होतात. समाजाने याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. निर्मला चौधरी यांनी मार्गदर्शन केले.अ‍ॅड. सूत्रसंचालन अ‍ॅड. वृषाली तांदळे यांनी केले. आभार अ‍ॅड. अनिता दिघे यांनी मानले. यावेळी न्यायाधार संस्थेच्या सचिव अ‍ॅड. नीलिमा भणगे-दंडवते, कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक सुषमा बिडवे, अ‍ॅड. दीक्षा बनसोडे, अ‍ॅड. अनुराधा येवले, अ‍ॅड. निरुपमा काकडे, शकुंतला लोखंडे, सुमन काळापहाड, गौतमी भिंगारदिवे, रजनी ताठे, शबाना शेख, अ‍ॅड. खेडकर आदी उपस्थित होत्या.

फोटो ०८ शिबिर

ओळी - कौटुंबिक न्यायालयात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी न्यायधीश नेत्रा कंकसमवेत कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश एन. एस. आणेकर, अ‍ॅड. मीनाक्षी कराळे, अ‍ॅड. निर्मला चौधरी आदी.

Web Title: Let women prove their mettle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.