शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोमात राहण्यापेक्षा आमच्यासोबत या : प्रकाश आंबेडकरांचे आघाडीला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:42 IST

काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या चौकशा लावून त्यांना कोमात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे़ त्यासाठी चौकशीचे उंदीर बाहेर काढत आहे,

अहमदनगर : काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या चौकशा लावून त्यांना कोमात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे़ त्यासाठी चौकशीचे उंदीर बाहेर काढत आहे, असे सांगून वंचित बहुजन आघाडीसोबत आल्यास तुमचा कोमा कायचा काढून टाकू, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी नगर येथे केले़वंचित बहुजन आघाडीच्या येथील क्लेराब्रुस मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते़ यावेळी लक्ष्मन माने, किसन चव्हाण, अरुण जाधव, किसन चव्हाण आदी उपस्थित होते़ भाजपसह काँग्रेस आघाडीवर आंबेडकर यांनी जोरदार टीका केली़ ते म्हणाले, देशभरातील वंचितांची मूठ बांधण्याचे काम सुरू केले़ त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे़ काहीजण सांगतायेत की बहुजन वंचित आघाडीला भाजपाचा छुपा पाठिंबा आहे़ सत्तेसाठी भाजपची ही खेळी आहे, पण मी त्यांना सांगून इच्छितो की, आम्ही कधी आरएसएसच्या नेत्यांबरोबर बसलो नाही़ परंतु तुम्ही सत्तेसाठी कुणासोबतही जायला तयार आहात़पंतप्रधान नरेंद्र मोदी जस-जशी निवडणूक जवळल येईल, तस-तसे चौकशीचे उंदीर हळूच बाहेर काढतील आणि बघा यांनी किती भ्रष्ट्राचार केला आहे, हे ते देशाला सांगतील़ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही आवाज तर त्यांनी दाबलाच आहे़आता बारामतीकरांचाही आवाज ते दाबणार आहेत़ त्यासाठी सरकारने बारामतीचा दाऊद नावाचा उंदीर बाहेर काढला आहे़ त्यामुळे यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसही कोमात जाईल़ अशा पद्धतीने दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना सरकार शेवटपर्यंत कोमात ठेवेल, असे भाकितही आंबेडकर यांनी केले़ यावेळी किसन चव्हाण, अरुण जाधव यांची भाषणे झाली़ सूत्रसंचालन संजय चव्हाण यांनी केले़निवडणुकीतून आरएसएसचा खात्मा करादेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रडणे, हसणे, लढाई युध्द काहीच खरे नाही़ देशाचे सूत्र नागपूरातून हालविले जात आहेत़ देशाची लोकशाही झारीतील शुक्राचार्यांच्या हाती आहे़ त्यांचे अस्तित्व धोक्यात आले की सर्वप्रथम जात बाहेर काढतात़ त्यानेही प्रश्न सुटला नाही तर धर्म बाहेर काढतात़ धर्मानेही प्रश्न सुटत नसल्याने ते आता देश संकटात असल्याचे सांगत आहेत़ देशावर कुठलेही संकट नाही़ असे असताना युध्दाचे कारण पुढे करून ते देशात आणीबाणी जाहीर करू शकतात, अशी भीती लक्ष्मण माने यांनी व्यक्त केली़भाजपकडून कारवायांचे मार्केटिंगपाकिस्तानवर यापूर्वी भारताने अनेक मोठ्या कारवाया केल्या़ पण त्याचे मार्केटिंग कधीही केले नाही़ भाजप सरकारकडून मात्र पाकिस्तानी कारवायांचे जबरदस्त मार्केटिंग केले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी नगर येथे केला़वंचित बहुजन आघाडीच्या येथील क्लेराब्रुस मैदानावर झालेल्या सत्ता परिवर्तन सभेत ते बोलत होते़यावेळी लक्ष्मण माने, किसन चव्हाण, अरुण जाधव, अशोक सोनवणे आदी उपस्थित होते़ भारत- पाकिस्तान कारवायांवरून आंबेडकर यांनी भाजप सरकारावर टीकेची झोड उठविली़ ते म्हणाले़, पाकिस्तान तिकडे बसून देशाची खोड काढतो आहे़ त्याविरोधात लढण्याचे ठोस धोरण सरकारकडे नाही़ पाकिस्तानला धडा शिकविण्याची गरज आहे़ त्यासाठी हिंमत लागते़ ती आपल्या देशाचे ५६ इंच छाती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही़ सर्जिकलस्ट्राईकचाही काहीही परिणाम झालेला नाही़ पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या सैनिकांनी पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला़ या कारवाईचे स्वागतच आहे़ पण, खरोखर हवाई हल्ल्याची गरज होती का ? मिसाईल टाकणेही शक्य होते़ पण तसे न करता हवाई हल्ला केला गेला़ विमाने पाकिस्तानात घुसविली़ मग माघार का घेतली? लढाई सुरूच ठेवायला हवी होती़ जोपर्यंत शेवटचा मरत नाही, तोपर्यंत कारवाई सुरूच राहिली असती तर पाकिस्तानला जरब बसली असती़ परंतु, तसे केले नाही़ त्यामुळे पाकिस्तानची हिमंत वाढली आहे़ परिणामी या कारवाया आपल्या बाजूने कमी, विरोधात जास्त गेल्या आहेत, अशी टीका आंबेडकर यांनी यावेळी केली़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस