जेऊर कुंभारीत बिबट्याने पाडला दोन शेळ्याचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:41 IST2020-06-20T12:41:11+5:302020-06-20T12:41:35+5:30

कोपरगाव : तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील परसरीरात बिबट्याने हल्ला करून गुरूवारी दुपारी  तीन वाजेच्या सुमारास चव्हाण वस्ती येथील शरद चव्हाण व सुधाकर चव्हाण या दोघा भावांच्या दोन शेळ्याचा फडशा पाडला आहे. वनविभागाचे अधिकाऱ्यानी शुक्रवारी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.

A leopard knocked down two goats in a pot | जेऊर कुंभारीत बिबट्याने पाडला दोन शेळ्याचा फडशा

जेऊर कुंभारीत बिबट्याने पाडला दोन शेळ्याचा फडशा

कोपरगाव : तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील परसरीरात बिबट्याने हल्ला करून गुरूवारी दुपारी  तीन वाजेच्या सुमारास चव्हाण वस्ती येथील शरद चव्हाण व सुधाकर चव्हाण या दोघा भावांच्या दोन शेळ्याचा फडशा पाडला आहे. वनविभागाचे अधिकाऱ्यानी शुक्रवारी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.

    गुरूवारी सुधाकर चव्हाण व शरद चव्हाण या दोघा भावांच्या शेळ्या बिबट्यांने ठार केल्या आहे. यात त्यांचे चौदा हजार रूपयेचे नुकसान झाल्याची माहीती सुधाकर चव्हाण यांनी दिली आहे.

    या अगोदर चव्हाण वस्तीवरील जयराम चव्हाण यांनी बिबट्या प्रत्यक्ष बघीतला होता, तसेच  त्यावेळी जयराम चव्हाण यांनी वनविभागाला कळवले होते. आणि पिंजरा लावा अशी मागणीही केली होती. पण या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

Web Title: A leopard knocked down two goats in a pot