दादासाहेब रुपवते यांचा वारसा वाढविला पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST2021-07-25T04:19:08+5:302021-07-25T04:19:08+5:30
माजी सांस्कृतिक व समाजकल्याण मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (दि. २४) संगमनेरात आयोजित अभिवादन सभेत ते ...

दादासाहेब रुपवते यांचा वारसा वाढविला पाहिजे
माजी सांस्कृतिक व समाजकल्याण मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (दि. २४) संगमनेरात आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते कारभारी उगले, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, विश्वस्त उत्कर्षा रुपवते, संस्थेचे रजिस्टार वसंत बैचे, मधुकर सोनवणे आदी उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ऑनलाईन उपस्थित होते.
रुपवते म्हणाले, दादासाहेब रुपवते हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. राजकारणात राहून त्यांनी अत्यंत सामंजस्याची भूमिका बजाविली. त्यांचे सगळे जीवन दलित व शोषित समाजासाठी वाहिलेले होते. आम्हा भावंडांना त्यांनी समाजसेवेचा वसा दिला. त्यांनी स्थापन केलेल्या बहुजन शिक्षण संघाचा आज वटवृक्ष झाला आहे. सूत्रसंचालन के. जी. भालेराव यांनी केले. रजिस्टार बैचे यांनी आभार मानले. जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, डॉ. सोमनाथ मुटकुळे, राष्ट्र सेवा दलाचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक, मिलिंद गायकवाड, डॉ. नामदेव गुंजाळ, डॉ. सुधारक पेटकर, वसंत बंदावणे, प्रकाश पारखे आदी उपस्थित होते.
---------------
दादासाहेबांचा सल्ला नेहमीच उपयोगी
माजी सांस्कृतिक व समाजकल्याण मंत्री दादासाहेब रुपवते आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. दादासाहेबांनी बहुजन शिक्षक संघातून अनेक कार्यकर्ते घडविले. सामाजिक चळवळी दादासाहेबांचा विचार घेऊन चालतात. राजकारणात दादासाहेबांचा सल्ला नेहमीच उपयोगी पडल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.