बारा जणांना घरी सोडले; नगर जिल्ह्यात आज नवे पाच रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 13:48 IST2020-06-07T13:47:45+5:302020-06-07T13:48:22+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव नगर जिल्ह्यात वाढतच आहे.  रविवारी (दि.७ जून) पुन्हा पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दुसरीकडे बरे होऊनही रुण घरी जात आहेत.  रविवारी बारा जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

Left twelve at home; Five new patients were found in Nagar district today | बारा जणांना घरी सोडले; नगर जिल्ह्यात आज नवे पाच रुग्ण आढळले

बारा जणांना घरी सोडले; नगर जिल्ह्यात आज नवे पाच रुग्ण आढळले

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव नगर जिल्ह्यात वाढतच आहे.  रविवारी (दि.७ जून) पुन्हा पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दुसरीकडे बरे होऊनही रुण घरी जात आहेत.  रविवारी बारा जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यातील १२१ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आता ८० अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. रविवारी कोरोना मुक्त होऊन घरी परतलेल्यामध्ये नगर शहरातील ५, संगमनेर येथील २, राशीन (कर्जत) येथील २, नेवासा, राहाता आणि अकोले येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

रविवारी जिल्ह्यात ५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर २९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राहाता तालुक्यातील निघोज, निमगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. प्रवरानगर येथील ३४ वर्षीय महिला आणि अकरा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

 नगर शहरातील पाचपीर चावडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती आधीच्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता. 

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१२ इतकी झाली आहे.

Web Title: Left twelve at home; Five new patients were found in Nagar district today