उक्कलगावात बिबट्याने दिले दर्शन
By Admin | Updated: May 29, 2017 13:31 IST2017-05-29T13:31:05+5:302017-05-29T13:31:05+5:30
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे रविवारी रात्री ग्रामस्थांना बिबट्याने दर्शन दिले. यामुळे गावक-यांनी अक्षरश: रात्र जागून काढली.

उक्कलगावात बिबट्याने दिले दर्शन
ल कमत न्यूज नेटवर्क बेलापूर (अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे रविवारी रात्री ग्रामस्थांना बिबट्याने दर्शन दिले. यामुळे गावक-यांनी अक्षरश: रात्र जागून काढली. काही दिवसापूर्वी आजूबाजूच्या गावात धुडगूस घालणारा बिबट्या आता उक्कलगाव भागात दाखल झाला आहे. बिबट्याची दहशत असल्यामुळे शेत मजूर कामावर जाण्यास धजावत नाहीत. रविवारी रात्री आठच्या सुमारास पटेलवाडी रोडवर लक्समन सुखदेव थोरात यांच्या द्राक्ष बागेजवळ बिबट्याने दर्शन दिले. लोकांनी एकत्र येत बिबट्याला पळविण्यासाठी फटाके फोडले. त्यानंतर बिबट्या थोरात यांच्या वस्तीवर आला. फटाके फोडल्यामुळे बिबट्या मक्याच्या शेतात शिरला.