शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

मुख्यालय सोडून रेडझोनध्ये प्रवेश; मोटार वाहन निरीक्षकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:52 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमून दिलेल्या कर्तव्यावर कार्यरत असताना वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडून रेड झोनमध्ये (पुणे) गेलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक राजेश अहुजा यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमून दिलेल्या कर्तव्यावर कार्यरत असताना वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडून रेड झोनमध्ये (पुणे) गेलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक राजेश अहुजा यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अहुजा यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ यामधील कलम ३ चा भंग केला असून त्यांच्या विरोधात कलम १८८ नुसार कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना दिले होते. या आदेशानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आहुजा यांच्याविरोधात शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.आहुजा गेले पुण्यालाकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व मोटार वाहन निरीक्षक यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचा-यांच्या  सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचा-यांना पूर्व परवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नाहीत, असे जिल्हाधिका-यांचे आदेश आहेत. मोटार वाहन निरीक्षक आहुजा यांनी मात्र पूर्व परवानगी न घेता ते ६ मे रोजी वैद्यकीय रजा टाकून नगर येथील मुख्यालय सोडून रेड झोन असलेले पुणे येथे गेले. अधिका-याने शासकीय आदेशाचा भंग केल्याने जिल्हाधिकारी यांनी थेट कारवाईचे आदेश दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRto officeआरटीओ ऑफीसPoliceपोलिस