वाळू सोडाच कच, मातीही मिळेना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:19 IST2021-02-15T04:19:50+5:302021-02-15T04:19:50+5:30

करंजी : शासनाने गोर-गरिबांना पक्के घर मिळावे यासाठी घरकूल योजना सुरू केली. प्रत्येक गावात आजही मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामे ...

Leave the sand and don't get any soil? | वाळू सोडाच कच, मातीही मिळेना?

वाळू सोडाच कच, मातीही मिळेना?

करंजी : शासनाने गोर-गरिबांना पक्के घर मिळावे यासाठी घरकूल योजना सुरू केली. प्रत्येक गावात आजही मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामे चालू आहेत. मात्र घरासाठी लागणाऱ्या वाळू विक्रीवर बंदी असल्याने घरकुले पूर्ण कशी करायची? अशा चिंतेत लाभधारक आहेत. या परिसरात तरी घरकूल मातीत बांधण्याची परवानगी द्यावी.

पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी, भोसे, खांडगाव, लोहसर, जोहारवाडी, कौडगाव, देवराई, घाटसिरस, सातवडसह अनेक गावात गोर- गरिबांना शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ मिळाला आहे तर अनेकांची घरकुले मंजूर झाली आहेत. घरकुले गरिबांची आहेत घर बांधण्यासाठी लागणारी वाळू गोर-गरीब घेऊ शकत नाहीत. ते आपल्या घरासाठी लोकल वाळूचाच वापर करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेवगावचे पोलीस पथक या भागात फिरत असल्याने वाहन चालकात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना घरे पूर्ण करण्यासाठी लोकल वाळूच काय पण क्रेशरवरची कचही मिळत नाही. या भागातील अनेक घरकुलांचे बांधकाम अर्धवट पडलेले आहे.

घरकुलासाठी लागणारी वाळू तर दुर्मिळ झालीच आहे पण या भागातील ट्रॅक्टर, टेम्पो चालक पोलीस पथकाच्या कारवाईच्या धास्तीने कच व माती आणण्याचे धाडस करीत नाहीत. त्यामुळे घरकुलांची कामे रखडली आहेत.

वाळू, कच मिळत नसल्याने शासनाने मातीत घर बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे रफिक शेख, ग्रा.पं. सदस्य बाबा गाडेकर, रोहीत अकोलकर, सुनील अकोलकर, आबासाहेब अकोलकर, गजानन गायकवाडसह अनेकांनी केली आहे.

----

परिसरातील अनेक गावात घरकुले मंजूर आहेत. मात्र कारवाईच्या धास्तीने वाहन चालक वाळू तर सोडाच कच व माती आणण्यास तयार नसल्याने घरकुलाचे बांधकाम अर्धवट आहेत.

-रोहित अकोलकर, बाबा गाडेकर

ग्रा.पं. सदस्य, करंजी

----

शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर अडवून पोलीस त्यांना दम देऊन व मारहाण करीत असल्याची तक्रार माझ्याकडे आलेली नाही. मात्र या प्रकरणी चौकशी करू.

-रणजित डेरे,

पोलीस निरीक्षक, पाथर्डी

फोटो : १४ करंजी घरकूल

करंजी येथील रखडलेले घरकूल.

Web Title: Leave the sand and don't get any soil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.