कुकडीचे पाणी चौंडी, दिघी, जवळा बंधाऱ्यात सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST2021-08-22T04:23:57+5:302021-08-22T04:23:57+5:30
नान्नज : सध्या कुकडी प्रकल्प धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी इतर भागाला न ...

कुकडीचे पाणी चौंडी, दिघी, जवळा बंधाऱ्यात सोडा
नान्नज : सध्या कुकडी प्रकल्प धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी इतर भागाला न सोडता अगोदर जामखेड तालुक्यातील चौंडी, दिघी व जवळाच्या बंधाऱ्यात सोडावे, अशी मागणी चौंडीचे सरपंच सुनील उबाळे यांनी केली.
यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस जामखेड तालुक्यात आहे. त्यामुळे चौंडी, दिघी, जवळा परिसरात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी इतर ठिकाणी न सोडता या भागात सोडावे. यंदा पाऊस नसल्याने नद्या, नाले, बंधारे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे ओव्हरफ्लोचे पाणी चौंडी, दिघी, जवळा बंधाऱ्यात सोडल्यास त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. आजपर्यंत जवळा बंधाऱ्यात कुकडीचे पाणी येण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांनी आंदोलने केली. मात्र, याची अद्याप दखल घेतलेली नाही, असे उबाळे यांनी म्हटले आहे.