शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकार जनतेत नाहीेतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर; राधाकृष्ण विखे यांची टीका, लोणीत भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 14:26 IST

सरकारचे आपत्ती व्यवस्थापन फक्त आधिका-यांच्या भरवश्यावर सुरु आहे. मंत्री फक्त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर दिसतात. केंद्राच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला तुम्ही काय देणार? असा सवालही येथे माजीमंत्री, आ.राधाकृष्ण विखे यांनी सरकारला केला.

लोणी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास राज्य सरकार संपूर्णत: अपयशी ठरले आहे. सरकारचे आपत्ती व्यवस्थापन फक्त आधिका-यांच्या भरवश्यावर सुरु आहे. मंत्री फक्त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर दिसतात. केंद्राच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला तुम्ही काय देणार? असा सवालही येथे माजीमंत्री, आ.राधाकृष्ण विखे यांनी सरकारला केला. लोणी बुद्रूूूक ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.२२ मे) आ.विखे यांच्या नेतृत्वाखाली फिजीकल डिस्टसिंगचा नियम पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. शिर्डी मतदार संघातील सर्वच गावांमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या घराच्या अंगणात महाराष्ट्र बचाव आंदोलन करुन आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा मास्क बांधून आणि काळे झेंडे दाखवून निषेध केला. लोणी बुद्रूक येथे झालेल्या आंदोलनात माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, नंदू राठी,चांगदेव विखे,  लक्ष्मण बनसोडे, अनिल विखे, अनिल विखे उपस्थित होते. कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळेच राज्यात रुग्णांची संख्या ४१ हजारांपर्यंत जावून पोहचली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकारने जाणीवपूर्वक केली नाही. केंद्र सरकारच्या मदतीचा लाभही आघाडी सरकार जनतेपर्यंत पोहोचवू शकले नसल्याने सरकारच्या या हलगर्जीपणामुळेच सर्वसामान्य नागरिक मृत्युच्या खाईत लोटला गेला असल्याचा थेट आरोप विखे यांनी यावेळी केला.  राज्यात पाहाणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीने ७६ हजार बेडची उपलब्धता करण्याची सूचना सरकारला केली होती. परंतू आघाडी सरकार फक्त तात्पुरत्या उपाययोजना करीत बसले. केंद्र सरकारने दिलेले पीपीई किटही डॉक्टर्स, नर्स आणि पोलीस दलापर्यंत पोहोचले नाहीत. उलट पोलिसांवर हल्ले होत असताना सरकारमधील मंत्र्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविताना आघाडी सरकार अतिशय असंवेदनशील वागले. महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत सरकारने मदत केंद्र उभी करायला हवी होती. पण सरकार तेही करु शकले नाही, असेही विखे म्हणाले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील