विद्यार्थ्यांसाठी एलसीडी संच भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST2021-02-05T06:39:21+5:302021-02-05T06:39:21+5:30

यावेळी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सखाराम लव्हाळे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, सुनील जमधडे, शिवशाहीर कल्याण काळे, ...

LCD set gift for students | विद्यार्थ्यांसाठी एलसीडी संच भेट

विद्यार्थ्यांसाठी एलसीडी संच भेट

यावेळी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सखाराम लव्हाळे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, सुनील जमधडे, शिवशाहीर कल्याण काळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल फटांगरे, राजेंद्र लोमटे, बाबासाहेब जमधडे, अमोल नजन, सोपान वडणे, एकनाथ काळे, मुख्याध्यापक त्रिंबक जाधव, भास्कर शिंदे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष पाराजी नजन आदी उपस्थित होते़ आपण ज्या विद्यालयात शिक्षण घेतले त्या विद्यालयास गुरु दक्षिणा म्हणून हा संच दिला असल्याचे बोरुडे यांनी सांगितले. यावेळी पल्लवी पांडुरंग नजन या विद्यार्थिनीस राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत धनादेश देण्यात आला. प्रदीप ताके यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांसाठी विद्यालयास एलसीडी संचची आवश्यकता होती. माजी विद्यार्थी अशोक बोरुडे यांनी स्वइच्छेने शाळेला एलसीडी संच दिल्याने याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे मुख्याध्यापक त्रिंबक जाधव यांनी सांगितले.

फोटो २९ भातकुडगाव

ओळी- विद्यालयास एलसीडी संच भेट देताना माजी विद्यार्थी अशोक बोरुडे़

Web Title: LCD set gift for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.