दिव्यांगांसाठी ऑनलाइन सर्टिफिकेट सुविधा तालुकास्तरावर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:21+5:302021-02-05T06:38:21+5:30

दिव्यांगांकडे अपंगत्वाचे सर्टिफिकेट नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय सुविधेचा लाभ घेता येत नाही. तसेच जिल्हाभरातून अपंगांना जिल्हा शासकीय रुग्णालयात यावे ...

Launch online certificate facility for the disabled at taluka level | दिव्यांगांसाठी ऑनलाइन सर्टिफिकेट सुविधा तालुकास्तरावर सुरू करा

दिव्यांगांसाठी ऑनलाइन सर्टिफिकेट सुविधा तालुकास्तरावर सुरू करा

दिव्यांगांकडे अपंगत्वाचे सर्टिफिकेट नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय सुविधेचा लाभ घेता येत नाही. तसेच जिल्हाभरातून अपंगांना जिल्हा शासकीय रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. त्यामुळे शासनाने दिव्यांगांसाठी ऑनलाइन सर्टिफिकेट सुविधा तालुका स्तरावर सुरू करावी जेणेकरून जिल्हा रुग्णालयात होणारी गर्दी कमी होईल. तसेच दिव्यागांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास होणार नाही. दिव्यांग व्यक्तींना ऑनलाइन सुविधा आठवड्यातून बुधवार व शुक्रवारी अशी दोन दिवस सुरू करावी, अशी मागणी रुद्र अपंग संघटनेच्या वतीने मंत्री मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यातआली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष आशा गायकवाड, जिल्हा सचिव बापू पांडुळे, जिल्हा उपाध्यक्ष महेश विभुते, नगर तालुकाध्यक्ष रामेश्वर तुपे आदी उपस्थित होते.

---------

फोटो - ३०रुद्र अपंग

दिव्यांगांसाठी ऑनलाइन सर्टिफिकेट सुविधा तालुकास्तरावर सुरू करावी, या मागणीचे निवेदन रुद्र अपंग संघटनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले.

Web Title: Launch online certificate facility for the disabled at taluka level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.