पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पंचवृक्ष मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:39 IST2021-03-04T04:39:31+5:302021-03-04T04:39:31+5:30

यावेळी आर्दश गाव पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे उपस्थित होते. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील डोंगराळ भागात पंचवृक्ष म्हणजे वड, पिंपळ, ...

Launch of Global Five Tree Campaign for Environmental Conservation | पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पंचवृक्ष मोहिमेचा शुभारंभ

पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पंचवृक्ष मोहिमेचा शुभारंभ

यावेळी आर्दश गाव पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे उपस्थित होते. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील डोंगराळ भागात पंचवृक्ष म्हणजे वड, पिंपळ, निंब, उंबर, वेल या पाच प्रकारच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या मोहिमेची जबाबदारी वृक्ष बँकेच्या संचालकांवर सोपविण्यात आली असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली.

यावेळी जय हिंद वृक्ष बँकेच्या संचालकपदी ए.जी. मेहेत्रे, रावसाहेब आव्हाड, अमोल धाडगे, शैलेंद्र पांढरे, मुकुंद मोरे, कुशल घुले, अनिल ससे, संतोष मगर, आत्माराम दहातोंडे, गोरक्षनाथ काळे, अ‍ॅड.संदीप जावळे, शिवाजी गर्जे, कमलेश घोरपडे, भाऊसाहेब देशमाने, उद्धव थोटे, अ‍ॅड. अविनाश बुधवंत, देवीदास येवले, एकनाथ माने, सचिन दहीफळे, आबासाहेब साळवे, भरत खाकाळ, अमोल ढेपे, हरिशंकर खेडकर, रवींद्र चव्हाण, सचिन पवार, वसीम पटेल, अ‍ॅड. मयुर डोके, नीळकंठ उल्हारे यांची निवड करण्यात आली. यावेळी पेरे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

फोटो ०३ जय हिंद

ओळी- जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या वृक्ष बँकेवर संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आर्दश गाव पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे समवेत शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, जगन्नाथ जावळे, संभाजी वांढेकर, महादेव शिरसाठ, खंडेराव लेंडाळ, अंकुश भोस, महादेव झिरपे, मयुर नवगिरे, प्रतीक शिंदे, बंडू नागरगोजे, प्रल्हाद राठोड, आकाश औटी, नागरगोजे, रामकृष्ण काकडे आदी.

Web Title: Launch of Global Five Tree Campaign for Environmental Conservation