अकोलेत कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:30+5:302021-06-22T04:15:30+5:30
अकोले तालुक्यातील जामगाव येथे सोमवारी सकाळी कृषी संजीवनी मोहिमेच्या सप्ताहाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ...

अकोलेत कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ
अकोले तालुक्यातील जामगाव येथे सोमवारी सकाळी कृषी संजीवनी मोहिमेच्या सप्ताहाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती कृषी सहायक भगवान वाकचौरे यांनी दिली. यावेळी उपसरपंच प्रकाश महाले, कृषी सहायक रूपेश सुपे, मीनानाथ गभाले, सचिन साबळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पथवे, अशोक महाले, नारायण आरोटे, देवीदास आरोटे, टी. एल. राऊत, सुनील मोहटे, भागवत उघडे आदी उपस्थित होते.
वाकचौरे यांनी सोयाबीन पेरणी कोणत्या पद्धतीने करावी, पेरणी बीबीएफ यंत्राने केल्याचे कोणकोणते फायदे होतात, बीबीएफ नसेल तर पेरणी कशाने करणे फायद्याचे ठरते, पेरणी करताना खत व्यवस्थापन कसे करायचे, याबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली. तज्ज्ञांनी तयार केलेल्या ऑडिओ, व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांना पेरणी व व्यवस्थापन कसे करावे, याबाबतची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती कृषी सहायक वाकचौरे यांनी दिली. शिवाजी महाले, बाळू महाले, भीमराव महाले यांनी आपल्या अडचणी मांडल्या. यावर चर्चा करून वाकचौरे यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. रूपेश सुपे यांनी आभार मानले.