गोडावून फोडून औषधांचे बॉक्स लंपास
By Admin | Updated: January 17, 2016 23:41 IST2016-01-17T23:40:06+5:302016-01-17T23:41:32+5:30
अहमदनगर : एका औषधी कंपनीच्या गोडावूनमधून औषधे ठेवलेले बॉक्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांनी ७० हजार रुपयांची औषधे चोरी केली आहेत.

गोडावून फोडून औषधांचे बॉक्स लंपास
अहमदनगर : एका औषधी कंपनीच्या गोडावूनमधून औषधे ठेवलेले बॉक्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांनी ७० हजार रुपयांची औषधे चोरी केली आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
बालिकाश्रम रोडवरील बोरुडे मळ््यात भाग्योदय रेसिडेन्सी या इमारतीमध्ये युथेनिक्स फार्मासुटीकल कंपनीचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये औषधांचे बॉक्स ठेवण्यात येतात. १३ ते १४ जानेवारीच्या रात्री ही चोरी झाली. गोडावूनचे कुलुप उघडून चोरट्यांनी ७० हजार रुपये किमतीचे बॉक्स चोरले. या प्रकरणी गोडावूनचे मालक सुनील सुधाकर अकोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान बोल्हेगाव येथील वीटभट्टीचे मालक बबन वाकळे यांच्या बंगल्यातून दहा तोळे सोने चोरीला गेल्याच्याच दिवशी ही घटना घडली आहे. शहरात चोरटे सक्रीय झाले असून आणखी काही ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकही धास्तावले आहेत.
(प्रतिनिधी)