पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लंकेंचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:26 IST2021-09-06T04:26:15+5:302021-09-06T04:26:15+5:30
पारनेर : आमदार नीलेश लंके हे सामान्य माणसांचे प्रश्न सोडविणार नेतृत्व आहे. त्यांचे विधानसभेतही काम चांगले आहे. पारनेर तालुक्यातील ...

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लंकेंचे प्रयत्न
पारनेर : आमदार नीलेश लंके हे सामान्य माणसांचे प्रश्न सोडविणार नेतृत्व आहे. त्यांचे विधानसभेतही काम चांगले आहे. पारनेर तालुक्यातील विविध भागांतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लंके प्रयत्न करत आहेत, असे गौरवोद्गार जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.
पारनेर तालुक्यातील सुपा, वाळवणे येथील चौकातील पूल व रस्ता मजबूत करणे, यासह विविध विकासकामांचा प्रारंभ शनिवारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार नीलेश लंके होते.
मंत्री पाटील म्हणाले, आमदार लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामामुळे जनसामान्य लोकांचे खूप मोठ्या प्रमाणावर प्राण वाचले. प्रत्यक्ष कोरोना सेंटरमध्ये थांबून लोकांना आधार दिला. राष्ट्रवादीला भेटलेले हे मोठे युवा नेतृत्व आहे.
यावेळी भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष उपसरपंच सचिन पठारे यांचा सन्मान करण्यात आला.
नीलेश लंके म्हणाले, आपल्याला विकास कामाच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास करण्याचे काम करायचे असल्याने, त्यासाठी वरिष्ठ पातळीवर आपल्याला भक्कम साथ आहे. सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष सचिन पठारे यांना भविष्यात चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रामसेतू आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मंत्री पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे शिक्षक आघाडी प्रमुख भाऊसाहेब भोगाडे, भाजपचे गुडु झरेकर आदींसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, कैलास गाडीलकर, अमृता रसाळ, सचिन पठारे, दादा शिंदे, बाबाजी तरटे, राहुल झावरे, डॉ.बाळासाहेब कावरे, जितेश सरडे, संदीप चौधरी, संजीव भोर, विजय औटी, रायभान औटी, नितीन गवारे, अजिंक्य गवळी, सचिन काळे, बंडू साबळे, पूनम मुगसे, राजश्री कोठावळे, सुभाष कावरे आदी उपस्थित होते.
-----
०५ लंके
सुपा, वाळवणे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार नीलेश लंके, राहुल झावरे, सचिन पठारे, सभापती प्रशांत गायकवाड, राजेंद्र फाळके व इतर.