गोधेगावात जमीन आरोग्य पत्रिका प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST2021-02-26T04:27:26+5:302021-02-26T04:27:26+5:30

नेवासा : तालुक्यातील गोधेगाव येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने जमीन आरोग्य पत्रिका प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी महात्मा ...

Land Health Magazine Training in Godhegaon | गोधेगावात जमीन आरोग्य पत्रिका प्रशिक्षण

गोधेगावात जमीन आरोग्य पत्रिका प्रशिक्षण

नेवासा : तालुक्यातील गोधेगाव येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने जमीन आरोग्य पत्रिका प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

या प्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. अनिल दुरगुडे, सोनई महाविद्यालयाचे नितीन मुरादे, गोपीचंद पल्हारे उपस्थित होते.

डॉ. दुरगुडे म्हणाले, माती व पाणी परीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीची आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. माती व पाणी परीक्षणानंतर प्रतीनुसार क्षार प्रतिकारक निवडावी व खतांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आत्मा अंतर्गत कांदा शेतीशाळा पिकांची पाहणी करून शेतीशाळेचे महत्त्व विशद केले.

यावेळी कृषी मंडळ अधिकारी प्रमोद गावडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती दिली.

कृषी सहायक सुनीता पुजारी, ‘आत्मा’चे श्री जाधव, शैलेश आहेर यांनी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यावेळी वैभव वैराळ, विकास बाचकर, मोहिनीराज जाधव, संदीप बाराहाते, दिगंबर शेलार, नामदेव अनकुले, श्रीधर अनकुले, सचिन शेळके आदी उपस्थित होते.

Web Title: Land Health Magazine Training in Godhegaon