आठ कोटींचा भूसंपादन प्रस्ताव मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST2021-05-28T04:16:22+5:302021-05-28T04:16:22+5:30

जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी शिर्डी कार्यालयाकडून प्रस्ताव गोदावरी खोरे विकास महामंडळ (औरंगाबाद) कार्यालयास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे खोपडी परिसरातील ...

Land acquisition proposal of Rs 8 crore | आठ कोटींचा भूसंपादन प्रस्ताव मार्गी

आठ कोटींचा भूसंपादन प्रस्ताव मार्गी

जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी शिर्डी कार्यालयाकडून प्रस्ताव गोदावरी खोरे विकास महामंडळ (औरंगाबाद) कार्यालयास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे खोपडी परिसरातील शेतकऱ्यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्यासाठी आभार मानले आहे.

याकामी विधीमंडळ स्तरावर अधिवेशन काळात तारांकित प्रश्न उपस्थित करून लाभार्थी शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची अडचण तत्कालीन आमदार कोल्हे यांनी मांडली होती. यापूर्वी लौकी आणि भोजडे येथील शेतकऱ्यांचा भूसंपादनाचा प्रश्न निकाली काढण्यात आला होता.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे व औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी नांदुर मध्यमेश्वर जलद कालव्यासाठी संपादित झालेल्या क्षेत्राचे पैसे अनेक वर्षांपासून प्रस्ताव त्रुटीमुळे प्रलंबित असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री विजय शिवतारे यांच्या लक्षात आणून दिले. त्यासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या. पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठपुरावा केला. त्याप्रमाणे प्रांताधिकारी यांनी ही रक्कम दोन दिवसात या कार्यालयास जमा करावी असे लेखी आदेश संबंधितांना काढले आहेत.

धोत्रे, घोयेगाव, वारी व अन्य गांवच्या भूसंपादित रकमेबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.

----------

Web Title: Land acquisition proposal of Rs 8 crore