पावणेदोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST2021-08-13T04:25:14+5:302021-08-13T04:25:14+5:30
इंदोरी येथील गणपत म्हातारबा रूकारी हे पत्नीसह मुलीकडे पुणे येथे बंगल्यास कुलूप लावून गेले होते. बंद बंगल्याचे कुलूप तोडून ...

पावणेदोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
इंदोरी येथील गणपत म्हातारबा रूकारी हे पत्नीसह मुलीकडे पुणे येथे बंगल्यास कुलूप लावून गेले होते. बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोराने घरात घुसून कपाटात ठेवलेले अंदाजे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे जुने सोन्याचे दागिने चोरून नेले. यात साडेतीन तोळ्यांचे गंठण, सव्वा तोळ्याची ठुसी, दोन अंगठ्या, मंगळसूत्राच्या वाट्या यांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी शेजारी राहणा-या भावकीतील लोकांच्या ही बाब लक्षात आली. रूकारी बुधवारी दुपारी घरी आल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. रुंभोडी येथे पद्मा मारुती मालुंजकर या एकट्या राहतात व त्यांची मुले नोकरीनिमित्त पुण्यात राहतात. त्या आजारी असलेल्या नगर सिव्हिल हाॅस्पिटल येथे आठ दिवसांपासून उपचार घेत आहेत. त्यांचे घर बंद होते, याचा फायदा घेऊन चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटातील ३४ हजार रुपये किमतीचे जुने सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. पुणे येथून संदीप मारुती मालुंजकर हे बुधवारी दुपारी रुंभोडीला आल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.