आमदार लंके यांच्या कोविड सेंटरला ‘लाख’मोलाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:16+5:302021-06-09T04:26:16+5:30
केडगाव : नगर - पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता.पारनेर) येथे उभारलेल्या ११०० बेडच्या कोविड सेंटरसाठी ...

आमदार लंके यांच्या कोविड सेंटरला ‘लाख’मोलाची मदत
केडगाव : नगर - पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता.पारनेर) येथे उभारलेल्या ११०० बेडच्या कोविड सेंटरसाठी सारोळा कासार (ता.नगर) येथील ग्रामस्थांनी १ लाख ५ हजार ५५५ रुपयांचा मदत निधी जमा करून दिला आहे. या मदतीचा धनाकर्ष (डी.डी.) नुकताच आमदार लंके यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
कोरोना संकटाच्या काळात गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळावेत या हेतूने आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे १ हजार १०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. आमदार लंके हे दिवसरात्र येथेच थांबून आहेत. आमदार लंके यांच्या या कार्याला अनेकांनी मदतीचा हात दिलेला आहे. सारोळा कासार ग्रामस्थांनीही स्वयंस्फूर्तीने या कामासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला व २ दिवसांत १ लाख ५ हजार ५५५ रुपयांचा मदत निधी जमा केला. ही मदत भाळवणी येथे जाऊन आमदार लंके यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी शिक्षकनेते संजय धामणे, उपसरपंच जयप्रकाश पाटील, सोसायटीचे चेअरमन संजय काळे, दूध संघाचे संचालक राजाराम धामणे, गोराभाऊ काळे, बाळासाहेब धामणे, ग्रामपंचायत सदस्य गजानन पुंड, सुनील हारदे, महेश धामणे, बाळासाहेब कडूस, शहाजान तांबोळी, मच्छिंद्र धामणे, गणेश काळे, सचिन कडूस, महेश रोडे आदी उपस्थित होते.
.................
फोटो ओळी : सारोळा कासार ग्रामस्थांच्यावतीने १ लाख ५ हजार ५५५ रुपयांचा मदत निधी आमदार निलेश लंके यांच्याकडे सुपुर्द करताना संजय धामणे, जयप्रकाश पाटील, संजय काळे, राजाराम धामणे, गोराभाऊ काळे, बाळासाहेब धामणे, गजानन पुंड, सुनील हारदे, महेश धामणे आदी.