भरदिवसा चार लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 18:23 IST2018-06-19T18:23:08+5:302018-06-19T18:23:59+5:30
नगर शहरात चोरी, घरफोडीच्या घटना सुरूच असून, मंगळवारी दुपारी तीन वाजता नोकरदाराचे चोरट्याने चार लाख रूपये पळविले.

भरदिवसा चार लाख लुटले
अहमदनगर: नगर शहरात चोरी, घरफोडीच्या घटना सुरूच असून, मंगळवारी दुपारी तीन वाजता नोकरदाराचे चोरट्याने चार लाख रूपये पळविले. मंगळवारी दुपारी ३ वाजता एस़टी़ महामंडळाच्या वर्कशॉपसमोर ही घटना घडली.
याप्रकरणी पोपट धोंडिबा कुलट (वय ५६ रा. खातगाव टाकळी ता. नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कुलट यांनी मंगळवारी दोन बँकांमधनू पैसे काढले होते. चार लाख रूपयांची बॅक दुचाकीच्या हॅडेलला लावून एस.टी.महामंडळाच्या वर्कशॉपपासून जात होते. त्यांना फोन अल्याने दुचाकी बाजूला लावून ते फोनवर बोलत होते. यावेळी एक अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आला. आणि म्हणाले तुमचे पैसे पडले आहेत. कुलट यांनी पाठीमागे पाहिले तेव्हा ५०० रूपयांच्या तीन नोटा पडलेल्या दिसल्या. कुलट हे पैसे घेण्यासाठी गेले तेव्हा चोरट्याने दुचाकीच्या हॅडेलला लावलेली बॅग घेऊन पोबारा केला. सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल सणस हे पुढील तपास करत आहेत.