शिर्डीतील दर्शनरांगेतील लाडूप्रसाद सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:36+5:302021-03-07T04:19:36+5:30

कोविड नियमांचे पालन करीत साई संस्थानने लाडू प्रसाद उत्पादन पुन:श्च प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे. साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन ...

Ladu Prasad in Darshan Range in Shirdi continues | शिर्डीतील दर्शनरांगेतील लाडूप्रसाद सुरू

शिर्डीतील दर्शनरांगेतील लाडूप्रसाद सुरू

कोविड नियमांचे पालन करीत साई संस्थानने लाडू प्रसाद उत्पादन पुन:श्च प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे. साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन झाल्यानंतर मंदिरातून बाहेर पडताना ५० ग्रॅम वजनाचा एक बुंदी लाडू प्रसादरूपाने विनामूल्य वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

साई संस्थानने तिरूपती देवस्थानच्या धर्तीवर १९९० पासून लाडू विक्री सुरू केली होती. त्यानंतर १५ ऑगस्ट २०१३ पासून दर्शनरांगेत हा लाडूप्रसाद संस्थानाकडून विनामूल्य देण्यात येऊ लागला. १६ नोव्हेंबरला मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सशुल्क लाडू प्रसाद पाकीट विक्री व दर्शनरांगेतील विनामूल्य बुंदी प्रसाद पाकीट वितरण पूर्णत: बंद करण्यात आले होते. लाडू शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येत असून भक्तांनी लाडूप्रसाद २४ तासांच्या आत सेवन करावा, असे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे.

Web Title: Ladu Prasad in Darshan Range in Shirdi continues