मजूर निघाले परतीच्या प्रवासाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:18 IST2021-04-03T04:18:30+5:302021-04-03T04:18:30+5:30

...... सोमवारी आढावा बैठक अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी पाणीपुरवठा विभागाची सोमवारी बैठक बोलविली आहे. ...

The laborer set out on his return journey | मजूर निघाले परतीच्या प्रवासाला

मजूर निघाले परतीच्या प्रवासाला

......

सोमवारी आढावा बैठक

अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी पाणीपुरवठा विभागाची सोमवारी बैठक बोलविली आहे. या बैठकीत शहरातील पाणी वितरणाच्या नियोजनाबाबत चर्चा होणार असून, पाण्याच्या वेळांमध्ये बदल करण्याचा निर्णय होऊ शकतो.

.....

सावेडीत रंगपंचमी साजरी

अहमदनगर : कोरोनाचे संकट असल्याने पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन सावेडी उपनगरात कोरडे रंग खेळत रंगपंचमी साजरी करण्यात आली. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून रंगपंचमी साजरी करण्यात आली.

......

टँकरने केला पुन्हा खड्डा

अहमदनगर : नगर- औरंगाबाद महामार्गावरील वसंत टेकडी येथून टँकरने शहरात पाणीपुरवठा केला जातो. औरंगाबाद महामार्गाची डांबर टाकून नुकतीच दुरुस्ती करण्यात आली आहे; परंतु मनपाच्या टँकरमुळे औरंगाबाद महामार्गावर वसंत टेकडी येथे पुन्हा खड्डे पडले असून, यात पाणी साचले आहे.

.....

Web Title: The laborer set out on his return journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.