नागरिकांचे श्रमदान.. कर्जतचे शहा उद्यान चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST2021-07-25T04:19:02+5:302021-07-25T04:19:02+5:30
कर्जत : शहरातील प्रभातनगर येथील रहिवाशांनी शुक्रवारी सायंकाळी श्रमदान करत शहा उद्यानात साफसफाई केली. उद्यान चकाचक करण्याच्या उपक्रमाचे शहरवासीयांनी ...

नागरिकांचे श्रमदान.. कर्जतचे शहा उद्यान चकाचक
कर्जत : शहरातील प्रभातनगर येथील रहिवाशांनी शुक्रवारी सायंकाळी श्रमदान करत शहा उद्यानात साफसफाई केली. उद्यान चकाचक करण्याच्या उपक्रमाचे शहरवासीयांनी कौतुक केले. यापुढेही हे अभियान सुरू ठेवण्याचा नागरिकांनी निर्णय घेतला.
माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे व उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून २५ लाख रुपये खर्च करून प्रभातनगर येथे शहा उद्यानची उभारणी केली. विशेष म्हणजे हे उद्यान संपूर्ण वनौषधींचे आहे. या बागेत फिरले तरी त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे होतात. त्यामुळे येथे फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या दोन महिनाभरापासून रिमझिम पाऊस पडत आहे. यामुळे येथे गाजर गवत मोठ्या प्रमाणावर वाढले होते. या बागेत प्रभातनगर येथील बाल गोपाळ, महिला मंडळ नियमितपणे फिरतात.
येथे गाजर गवतासह अनेक प्रकारच्या अनावशयक वनस्पती वाढल्या होत्या. हे प्रभातनगर येथील रहिवाशांच्या लक्षात आले. श्रमदान करून बागेची स्वच्छता करण्याचा निर्णय शुक्रवारी सकाळी झाला. सायंकाळी श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमात मुख्याधिकारी गोविंद जाधव, इंजिनिअर दिलीप कानगुडे, माजी सैनिक संजय हिरडे, व्यावसायिक नारायण तनपुरे, अरविंद पाटील, सचिन मुनोत, प्रवीण मुनोत, विनोद बोरा, शिक्षण क्षेत्रातील संजय शिंदे, धनंजय निकम, शेखर हिंगे, बाबूश्याम पवार, दत्तात्रय टकले, तालुका पोस्ट मास्तर रावसाहेब चौधरी, नगरपंचायत कर्मचारी किशोर भैलुमे आदींसह नागरिक सहभागी झाले होते.
----
२४ कर्जत गार्डन
कर्जत येथील प्रभातनगरमधील शहा उद्यानाची श्रमदानातून स्वच्छता करताना नागरिक.