क्षितिज घुले यांना महामंडळावर संधी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:37+5:302021-06-29T04:15:37+5:30
शेवगाव : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे उदयोन्मुख नेतृत्व, शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले पाटील यांना शासकीय महामंडळावर संधी द्यावी, अशी ...

क्षितिज घुले यांना महामंडळावर संधी द्यावी
शेवगाव : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे उदयोन्मुख नेतृत्व, शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले पाटील यांना शासकीय महामंडळावर संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, राहुल भोंगळे, तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे, पाथर्डी तालुका युवकचे अध्यक्ष चंद्रकांत मरकड, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, शहराध्यक्ष कमलेश लांडगे, पंचायत समिती सदस्य शिवाजी नेमाणे,
वाहबभाई शेख, एकनाथ कसाळ, संतोष पावसे, संतोष जाधव, रोहन साबळे, रोहित काथवटे, अभिजीत आहेर ,मिलिंद गायकवाड, प्रल्हाद देशमुख, समिर शेख, बंडू अकोलकर ,कृष्णा सातपुते, संकेत वांढेकर अशोक मरकड, आकाश शिंदे, सतीश शेळके, गोविंद किडमिंचे सतीश चव्हाण, दीपक गायकवाड, शैलेश अंधारे आदींसह दोन्ही तालुक्यांतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय कोळगे म्हणाले, विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या वेळी युवकांचे मजबूत संघटन उभा करून दोन्ही निवडणुकीमध्ये शेवगाव तालुक्यातून पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून दिले. शेवगाव पंचायत समिती पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च यशवंत पंचायतराजचा ग्रामीण विकास विभागाचा राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून काेरोना महामारी संक्रमणाच्या काळात कोविड केअर सेंटर उभारले. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात दुष्काळ असून, पाण्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना सोबत घेऊन कृती समिती स्थापन करून त्यांनी लढा दिला आहे. सभापती घुले यांचे मतदारसंघातील कार्य पाहता त्यांची महामंडळावर नियुक्ती करण्यात यावी, अशी भूमिका जनसामान्यांची असल्याचे कोळगे यांनी सांगितले.
-----
२८ शेवगाव घुले
पाथर्डी येथे डॉ. क्षितिज घुले यांना महामंडळावर संधी मिळावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या वतीने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना देण्यात आले.