चित्रकला स्पर्धेत रामेश्वर विद्यालयाचा कृष्णा टेके प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:59+5:302021-03-13T04:37:59+5:30
कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड या कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने घेतलेल्या चित्रकला पोस्टर स्पर्धेत रामेश्वर ...

चित्रकला स्पर्धेत रामेश्वर विद्यालयाचा कृष्णा टेके प्रथम
कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड या कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने घेतलेल्या चित्रकला पोस्टर स्पर्धेत रामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. यात कृष्णा टेके याने प्रथम क्रमांक, शिवम निळे द्वितीय, तर श्रेया टेके हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
सोमैया उद्योगसमूहाच्या वतीने दि. ४ ते ११ मार्चदरम्यान सुरक्षा सप्ताह पाळला जातो. त्यानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यातील पोस्टर स्पर्धेमध्ये वारी येथील श्री रामेश्वर विद्यालयाचे ८० विद्यार्थी बसले होते. नुकतेच यशस्वी विद्यार्थ्यांना कारखाना कार्यस्थळावर प्रमाणपत्र व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी सोमैया उद्योगसमूहाचे संचालक एस. मोहन होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे कारखान्याचे उपमहाव्यवस्थापक बी. एम. पालवे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. ए. पाळंदे, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मच्छिंद्र टेके यांनी कौतुक केले.