जेऊर येथे कोविड सेंटर सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:18 IST2021-04-03T04:18:32+5:302021-04-03T04:18:32+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत शुक्रवारी (दि.२) तहसीलदार उमेश पाटील यांनी येथील प्राथमिक आरोग्य ...

जेऊर येथे कोविड सेंटर सुरू होणार
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत शुक्रवारी (दि.२) तहसीलदार उमेश पाटील यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यक्ष पाहणी करून चर्चा केली. येथे लवकरच कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १६ गावांमध्ये आजपर्यंत ५०० रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. १८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.
कोविड सेंटर सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार उमेश पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत डॉ. योगेश कर्डिले यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी माजी उपसरपंच बंडू पवार, इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे, बाबासाहेब मगर, अण्णासाहेब मगर उपस्थित होते. तहसीलदार पाटील यांनी ग्रामपंचायतीकडून सहकार्य मिळाल्यास जेऊर येथे तत्काळ कोविड सेंटर सुरू करण्यात येईल, असे सांगितले. कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जेऊर येथील एक विद्यालय ताब्यात घेण्यात येणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात तहसीलदार पाटील यांनी कोरोनाची लस घेतली. आरोग्य केंद्रात होणाऱ्या कोरोना तपासणी व लसीकरणाची तहसीलदार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. यावेळी डॉक्टर योगेश कर्डिले यांनी कोविड सेंटर सुरू झाल्यास परिसरातील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.
---
०२ जेऊर१
जेऊर येथे तहसीलदार उमेश पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहणी केली.