कोतकरला नाशिक कारागृहात ठेवणार
By Admin | Updated: August 5, 2014 23:58 IST2014-08-05T23:44:13+5:302014-08-05T23:58:33+5:30
अहमदनगर : अशोक लांडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी भानुदास कोतकरसह अन्य आरोपींना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवावे, असे आदेश नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दिले आहेत.

कोतकरला नाशिक कारागृहात ठेवणार
अहमदनगर : अशोक लांडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी भानुदास कोतकरसह अन्य आरोपींना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवावे, असे आदेश नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. आरोपी वेळेत हजर नसल्याने खटल्याचे कामकाज आता ११ आॅगस्टला होणार आहे.
अशोक लांडे खून प्रकरणाची सुनावणी नाशिक येथील जिल्हा न्यायालयात सुरू आहे. आरोपींवर दोषारोपपत्र निश्चित झाले आहे. या सुनावणीसाठी दुपारी एकपर्यंत आरोपी न्यायालयात हजर नव्हते. नगर येथून आरोपींना नाशिकला आणण्यास उशिर केला जातो. त्यामुळे आरोपीला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवावे, अशी तक्रार या प्रकरणातील फिर्यादी शंकर राऊत यांनी न्यायालयाकडे केली होती.
दरम्यान मंगळवारी आरोपी हजर नसल्याने न्यायालयाने कोतकर याला नाशिकच्या कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान खटल्याचे कामकाज आता ११ आॅगस्टला होणार आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. श्रीधर माने काम पाहत आहेत.
(प्रतिनिधी)