कोरोनाचा लवकर नायनाट व्हावा, आमदार संग्राम जगतापांचे विशाल गणपतीला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 17:15 IST2020-04-12T17:15:21+5:302020-04-12T17:15:32+5:30
अहमदनगर : कोरोना विषाणूच्या संसगामुर्ळे संपूर्ण जग भयभीत झाले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनचा कालावधीही वाढविण्यात आला आहे. आता लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोनाचा लवकरात लवकर नायनाट व्हावा, असे साकडे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नगरचे ग्रामदैवत श्री. विशाल गणपतीला घातले आहे.

कोरोनाचा लवकर नायनाट व्हावा, आमदार संग्राम जगतापांचे विशाल गणपतीला साकडे
अहमदनगर : कोरोना विषाणूच्या संसगामुर्ळे संपूर्ण जग भयभीत झाले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनचा कालावधीही वाढविण्यात आला आहे. आता लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोनाचा लवकरात लवकर नायनाट व्हावा, असे साकडे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नगरचे ग्रामदैवत श्री. विशाल गणपतीला घातले आहे.
कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेऊन या विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी जनतेला या सूचनांचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे जनतेने पालन करत, कोणीही रस्त्यावर येत नाहीत. आपआपल्या घरात थांबून प्रशासन प्रतिसाद देत आहेत. यामुळे उद्योगधंदे, व्यवसाय बंद असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही आमच्या परीने नगर शहरातील सुमारे ७ हजार कुटुंबांना किराणा माल देण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही काही गोरगरिब जनता राहिली आहे. शहरातील कोणीही नागरिक उपाशी राहू नये व या विषाणूचा नायनाट व्हावा, यासाठी आ. संग्राम जगताप यांनी नगर शहराचे आराध्य दैवत विशाल गणपती या मंदिरात जाऊन पूजा करून गणपती बाप्पाला साकडे घातले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर आदी उपस्थित होते.