कोपरगाव तालुका कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST2020-12-16T04:35:41+5:302020-12-16T04:35:41+5:30
कोपरगाव : अयोध्या येथील श्रीराममंदिर निधी संकलन समिती यांच्या वतीने पूर्ण देशभरात १ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान निधी संकलन ...

कोपरगाव तालुका कार्यकारिणी जाहीर
कोपरगाव : अयोध्या येथील श्रीराममंदिर निधी संकलन समिती यांच्या वतीने पूर्ण देशभरात १ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान निधी संकलन करण्यात येत आहे. निधी संकलन अभियानाची कोपरगाव तालुक्याची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत कोपरगाव तालुक्याच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या बैठकीसाठी जिल्हा अभियानप्रमुख श्रीकांत नाळकांडे व सहप्रमुख ज्ञानेश अकसाळ उपस्थित होते.
निवड केलेल्या कार्यकारिणीमध्ये कोपरगाव तालुका अभियानप्रमुख योगेश पगारे, तालुका सहअभियानप्रमुख बाळासाहेब कदम व रवींद्र सुपेकर, निधी संकलनप्रमुख ललित ठोंबरे व अतुल शालिग्राम, कार्यालयप्रमुख सुरेश कांगुणे व दिलीप घोडके यांची नियुक्ती करण्यात आली. कोपरगाव शहराच्या नियोजन बैठकीत बुधवारी (दि. १६ डिसेंबर) उपस्थित राहण्याचे आवाहन संघाच्या स्वयंसेवकांच्या वतीने संघाचे संघचालक सुरेश विसपुते व तालुका अभियानप्रमुख योगेश पगारे यांनी केले आहे. ॲड. जयंत जोशी यांनी आभार मानले.