कोपरगावात शाळा, कॉलेज, दुकाने ठेवली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 16:42 IST2018-07-24T16:42:23+5:302018-07-24T16:42:31+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदच्या हाकेला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे.

कोपरगावात शाळा, कॉलेज, दुकाने ठेवली बंद
कोपरगाव : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदच्या हाकेला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे.
शहरातील सर्वच व्यापार्यांनी स्वयंमस्पूतीर्ने आपली दुकाने बंद ठेवली. तसेच शहरासह ग्रामीण भागातील सर्वच शाळा कॉलेज यांना सुटी देण्यात आली. बाहेरच्या बस आगाराच्या गाड्या कोपरगावात आल्याच नाही परंतु कोपरगाव आगाराच्या ग्रामीण भागातील बसेच्या फे-या सुरूच होत्या. परंतु कुठल्याच प्रकारचा कोणता अनुचीत प्रकार न घडता आंदोलन शांतेत सुरु होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब दत्तांत्रय शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोपरगाव मराठा क्रांतीमोर्चाच्या वतीने संध्याकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ शोकसभा घेण्यात येणार आहे. त्यांतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे, असे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.