कोपरगाव पीपल्सचे अध्यक्ष मुंदडा यांचा संजीवनी समूहच्या वतीने सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:25+5:302021-06-21T04:15:25+5:30
जिल्हा बँकेचे संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी मुंदडा यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्नेहलता कोल्हे ...

कोपरगाव पीपल्सचे अध्यक्ष मुंदडा यांचा संजीवनी समूहच्या वतीने सत्कार
जिल्हा बँकेचे संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी मुंदडा यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, आज सर्व क्षेत्रांत खुल्या अर्थव्यवस्थेचे आव्हान उभे राहिलेले आहे. बँकिंग क्षेत्रही यातून सुटलेले नाही. ठेवीदार, सभासद, व्यापारी आदी घटकांचा विश्वास संपादन करून तो टिकवणे ही तारेवरची कसरत आहे. तो विश्वास पीपल्स बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा व त्यांच्या सहकारी बांधवांनी अधिकाधिक वृद्धिंगत करावा.
सत्कारास उत्तर देताना मुंदडा यांनी व्यवस्थापनाने टाकलेली जबाबदारी समर्थपणे पेलून काम करू. संजीवनीच्या सत्काराची उभारी बँक कामकाजात निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे उत्तर दिले.
----
फोटो ओळी : कोपरगाव पीपल्स बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सत्येन मुंदडा यांचा सत्कार करताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे.
---