कोपरगावात कांदा १९०० रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 17:01 IST2018-07-04T17:00:14+5:302018-07-04T17:01:40+5:30
बाजार समितीत मंगळवारी एक नंबरच्या चांगल्या प्रतीच्या १९ कांदा गोणीला प्रती क्विंटल १ हजार ९०० अशी माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली आहे.

कोपरगावात कांदा १९०० रुपयांवर
कोपरगाव : बाजार समितीत मंगळवारी एक नंबरच्या चांगल्या प्रतीच्या १९ कांदा गोणीला प्रती क्विंटल १ हजार ९०० अशी माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली आहे.
शेतकरी बांधवानी आपला कांदा दर मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस कांदा लिलाव होत आहे. मंगळवारी झालेल्या लिलावासाठी ११ हजार ७५ कांदा गोण्याची आवक झाली होती. यात एक नंबर कांद्याला ११०० ते १८००, दोन नंबर कांद्याला ९०० ते ११००, गोल्टी कांद्याला ३०० ते १००० भाव मिळाला आहे. तर जोड कांद्यास १५० ते ४०० रुपये भाव मिळाला असल्याची माहिती सचिव परसराम सिनगर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.