कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 15:37 IST2020-06-25T15:37:04+5:302020-06-25T15:37:17+5:30
कोपरगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.२५) तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
कोपरगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर याच्या प्रतिमेला आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.२५) तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
गोपीचंद पडळकर यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवकचे अध्यक्ष नवाज कुरेशी, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रतिभा शिलेदार, युवतीच्या अध्यक्षा माधवी वाकचौरे, गटनेते वीरेन बोरावके, सर्व नगरसेवक, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.