कोपरगावच्या आमदारांनी क्रीडा क्षेत्रात राजकारण आणू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:54+5:302021-02-05T06:31:54+5:30
कोपरगाव : तालुक्यातील खेळाडूंना सुविधा निर्माण होण्यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे तालुक्यासाठी ...

कोपरगावच्या आमदारांनी क्रीडा क्षेत्रात राजकारण आणू नये
कोपरगाव : तालुक्यातील खेळाडूंना सुविधा निर्माण होण्यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे तालुक्यासाठी सोळा वर्षांपूर्वीच तालुका क्रीडा संकुल मंजूर झाले. परंतु, कोपरगाव शहरात किंवा जवळ पुरेशी जागा उपलब्ध न झाल्यामुळे त्यांनी स्वतःच्या अधिपत्याखालील संस्थांची ६ एकर जागा सध्याच्या क्रीडा संकुलासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली.
मात्र, याची जाणीव न ठेवता विद्यमान आमदार हे क्रीडा क्षेत्रात राजकारण आणू पाहात आहेत, असे मत संजीवनी फाऊंडेशनचे सचिव युवानेते सुमित कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांचे नाव न घेता प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.
कोल्हे म्हणाले, विद्यमान आमदार यांनी नुकत्याच एका क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणात बोलताना सांगितले की, सध्याचे तालुका क्रीडा संकुल शहराच्या बाहेर आहे. त्यामुळे शहरालगत उपसंकुल उभारण्याच्या प्रयत्नात आहोत. परंतु, सर्वांनीच मागील पाठपुराव्याची व सत्य परिस्थितीची माहिती घेणे गरजेचे आहे. ज्या जागा भविष्यातील उपसंकुलासाठी आमदार सांगत आहे, त्या जागा तांत्रिक अडचणी व पुरेशा नसल्यानेच व शहरालगत कोणी जागा देण्यास तयार नव्हते. त्यामुळेच माजी मंत्री कोल्हे यांनी स्वतःच्या अधिपत्याखालील संजीवनी कृषी, शैक्षणिक व ग्रामीण विकास संस्था या संस्थेची ३ एकर ३६ गुंठे जागा उपलब्ध करून दिली. मात्र, या जागेत ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक व्यवस्थित बसत नसल्याने संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेने २ एकर क्षेत्र क्रीडा संकुलासाठी दिले. अशी एकूण सुमारे ६ एकर जागा दिली. एवढेच नव्हे तर शासनाने दिलेल्या २५ लाख निधीत अपेक्षित क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होत नाही, असे लक्षात येताच संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्यावतीने १४ लाखांचा अधिकचा निधी देऊन क्रीडा संकुलाचे काम पूर्ण केले. आजही माजी मंत्री कोल्हे तेथील उपक्रमांची नियमित माहिती घेऊन तेथील समस्यांचे निराकरण करतात. त्यामुळे इतर कोणी जिव्हाळा दाखविण्याच्या नावाखाली क्रीडा क्षेत्रात राजकारण आणू नये, असेही कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.
............
फोटो०३- सुमित कोल्हे - कोपरगाव
030221\sumit kolhe - kopargaon.jpg
फोटो०३- सुमित कोल्हे - कोपरगाव