कोपरगावातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 15:21 IST2018-10-23T15:21:06+5:302018-10-23T15:21:09+5:30
कोपरगाव तहसील कार्यालयासमोर सलग दुस-या दिवशी सुरु असलेले बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे.

कोपरगावातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
कोपरगाव : तालुक्याचे नाव दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करावे तसेच इतर मागण्यांसाठी सोमवार पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते याच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तहसील कार्यालयासमोर सलग दुस-या दिवशी सुरु असलेले बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे.
आशुतोष काळे यांच्यासोबत अनेक शेतकरी तसेच कार्यकर्ते उपोषणास बसलेले आहे. त्यापैकी तीन उपोषण कर्त्यांची आज दुपारी १२ .३० च्या सुमारास प्रकृती खालावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले ,धोत्रे येथील तालिफभाई सय्यद व मुर्शतपूर येथील विष्णू शिंदे यांना उपचारसाठी तातडीने कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यवर उपचार सुरु आहेत.