संपामुळे कोपरगाव बसस्थानकाला १४ लाखांचा आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 18:37 IST2018-06-10T18:36:49+5:302018-06-10T18:37:14+5:30
गेल्या दोन दिवसापासून पगारवाढीच्या मुद्यावरून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होत यामध्ये कोपरगाव स्थानकाला देखील १४ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे.

संपामुळे कोपरगाव बसस्थानकाला १४ लाखांचा आर्थिक फटका
कोपरगाव : गेल्या दोन दिवसापासून पगारवाढीच्या मुद्यावरून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होत यामध्ये कोपरगाव स्थानकाला देखील १४ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे.
कोपरगाव स्थानकातून दररोज जवळपास १७ ते १८ हजार प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामध्ये कोपरगावच्या १८६ बसेस तर बाहेर गावच्या १५० बसेस दररोज ७०० फेºया मारतात. यातून जवळपास दररोज २७ हजार ५०० किलोमीटर अंतर कापतात. यामध्ये १६० चालक तर १४८ वाहक असे एकूण ३०८ कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यापैकी २० टक्केच कर्मचारी कामावर हजर झाल्याने व ८० टक्के कर्मचारी संपात सहभागी असल्याने ७०० पैकी ६०० बस फेºया रद्द झाल्या होत्या. त्यामुळे कोपरगाव स्थानकाचे एका दिवसाला ७ लाखाचे उत्पन्न असून दोन दिवसाचे मिळून जवळपास १४ लाखाचे आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती कोपरगाव बसस्थानक प्रमुख बाळासाहेब कोते यांनी दिली.