कोपरगावात एका तासात कुत्र्याने घेतला ११ जणांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 14:42 IST2018-11-28T14:41:57+5:302018-11-28T14:42:27+5:30
शहरातील सुदेश टॉकीज, सावरकर चौक, धान्य मार्केट, बाजारतळ या वर्दळीच्या परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने आज तासाभरात जवळपास ११ नागरिकांना चावा घेतला.

कोपरगावात एका तासात कुत्र्याने घेतला ११ जणांना चावा
कोपरगाव : शहरातील सुदेश टॉकीज, सावरकर चौक, धान्य मार्केट, बाजारतळ या वर्दळीच्या परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने आज तासाभरात जवळपास ११ नागरिकांना चावा घेतला.
गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा, जनावरांचा, डुकरांचा सुळसुळाट आहे. नागरिकांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. परंतु या संदर्भात पालिका प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळेच शहरात अश्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच अजूनही पालिका प्रशासनाकडून सदरचे कुत्रे पकडण्यासाठी कोणतीच हालचाल झाली नाही. पालिका प्रशासनाने कुत्रे पकडून त्यास ठार मारण्यात आले.