कोल्हे यांचे मूळ काँग्रेसच आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:20 IST2021-01-23T04:20:29+5:302021-01-23T04:20:29+5:30

पोटे म्हणाले, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल कोल्हे यांचे स्वागतच आहे. या यशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोल्हे यांनी ...

Kolhe is originally from the Congress | कोल्हे यांचे मूळ काँग्रेसच आहे

कोल्हे यांचे मूळ काँग्रेसच आहे

पोटे म्हणाले, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल कोल्हे यांचे स्वागतच आहे. या यशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोल्हे यांनी गांधी घराण्यावर मिश्किल टिपण्णी केली. परंतु, विजयाची हवा काही क्षणात डोक्यात जाऊन राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यावर टीकास्त्र सोडून प्रसिद्धीस पात्र होणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. मोकळे भांडे आवाज करते, भरलेले भांडे कधीही आवाज करत नाही. काँग्रेस पक्षाचे विचार व नेते हे ज्ञानाने भरलेल्या भांड्याप्रमाणे आहे. त्यास प्रसिद्धीची गरज नाही. आपण ज्या पक्षात आहेत त्यात मोकळ्या भांड्याप्रमाणे फक्त आवाज, घोषणा आणि भाषण करणारे लोक आहेत. जनता हुशार आहे. आगामी काळात लोक प्रत्येकाची जागा निश्चित दाखवतील यात शंका नाही. अवघ्या जनतेला जेष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा राजकीय जीवनप्रवास, कर्तृत्व ठाऊक आहे. त्यातला मूळचा गाभा हा काँग्रेस पक्षाचा आहे. आपण जर मूळ पाया विसरून गांधी घराण्यावर आरोप करणार असाल, तर यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल.

यावेळी तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय आंग्रे, तालुकाध्यक्ष श्रीजय चांदगुडे उपस्थित होते.

Web Title: Kolhe is originally from the Congress