किसान संघर्ष समितीचे संगमनेर प्रांत कचेरीसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:48+5:302020-12-15T04:36:48+5:30
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या प्रदेशाध्यक्षा निशा शिवूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात ...

किसान संघर्ष समितीचे संगमनेर प्रांत कचेरीसमोर आंदोलन
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या प्रदेशाध्यक्षा निशा शिवूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
शिवाजी गायकवाड, अनिल गुंजाळ, सुनंदा रहाणे, अनिल काढणे, ज्ञानदेव सहाणे, भास्कर पावसे, शांताराम गोसावी, ज्ञानेश्वर राक्षे, नारायण भांबरे, बाबुराव गायकवाड, क्रांती गायकवाड, इंदुमती घुले, आनंद लांडगे, अशोक डुबे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
दिल्लीत गेल्या पंधरा दिवसांपासून किसान संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीत १५ आंदोलक शहीद झाले. केंद्र सरकारने दिलेले तेच तेच प्रस्ताव शेतकरी संघटनांनी अमान्य केले आहेत. मोदी सरकारच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करून शेतकरी संघटनांनी देशभर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संगमनेरातील हे आंदोलन करण्यात आले. असे शिवूरकर यांनी सांगितले.
___
फोटो नेम :१४किसान आंदोलन
....
ओळी : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर प्रांत कचेरीसमोर किसान संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन केले.